राज्याची ‘ही’ मराठमोळी लाडकी जोडी ‘लालपरी’ची बनली ब्रॅण्ड अॅम्बेसिडर...
मुंबई – राज्याचे सुप्रसिद्ध मराठमोळे लाडके दांपत्य अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दोघांची एसटी महामंडळाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाली आहे.
या त्यांच्या निवडीमुळे राज्याच्या ‘लालपरी’ ला नव्या चेहऱ्यांची साथ मिळणार आहे. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक आणि आकर्षक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.