शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या फुटबॉल प्रशिक्षण शिबीराला सुरुवात...
कोल्हापूर- शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने १२ ते १६ वर्षांखालील मुलांसाठी मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ शिवाजी स्टेडियमवर राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू डॉ. मुक्ता पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्षस्थानी बंटी सावंत होते.
२१ एप्रिल ते २० मे या कालावधीत हे शिबीर सुरु राहणार आहे. कोल्हापूरला लाभलेली समृद्ध फुटबॉल परंपरा जपत नव्या पिढीत खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच मुलांना तंत्रशुद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यावेळी खेळाडूंना मूलभूत कौशल्ये, फिटनेस तसेच खेळातील शिस्त यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी डॉ. अभिजीत बेलेकर, नगरसेवक विनायक फाळके, संपत जाधव, महावीर मूग, उदय पाटील, किरण साळोखे, प्रमोद भोसले, महेश पाटील, सुशील गायकवाड आदींसह खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.