ब्रेकिंग न्यूज
क्राईम

तारदाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा… ५ जण ताब्यात

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील हनुमाननगर परिसरात रविवारी रात्री ११ च्या सुमारास जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती शहापूर पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शिवराज बबन दौंड, सुनील मारुती वडर, कासिम शिराज अरब, प्रकाश गोविंद आडके आणि प्रमोद भैरू बेटाळे हे जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत घटनास्थळावरून ३५ हजार ३४० रुपये रोख रक्कम, ७२ हजार किंमतीचे ७ मोबाईल आणि १ लाख रूपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण दोन लाख ७ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top