ब्रेकिंग न्यूज
क्राईम

उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून सोफा पेटवला…संशयित उमेश साळुंखेला पोलीस कोठडी

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – अशोक मारुती पोवार हे राजारामपुरीमधील नवश्या मारुती मंदिर परिसरात कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांचा मुलगा मयूर पोवार याने यादव नगरात राहणाऱ्या मोकांतर्गत कारवाईतील संशयित उमेश श्रीमंत साळुंखे याच्याकडून तीस हजार रुपये हात उसने घेतले होते. साळुंखे याने वारंवार पैशांची मागणी करून देखील मयूर पोवार हा पैसे द्यायला टाळाटाळ करत होता.

याच रागातून उमेश साळुंखे याने गुरुवारी सायंकाळी पोवार यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी करत पोवार कुटुंबियांना शिवीगाळ केली. त्यानंतर उमेश साळुंखेने बाटलीतून आणलेले पेट्रोल पोवार यांच्या घरातील सोफासेटवर टाकून सोफासेट पेटवून देत २५ हजारांचे नुकसान केले. या प्रकरणी अशोक मारुती पोवार यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री उशिरा उमेश श्रीमंत साळुंखे याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज राजारामपुरी पोलिसांनी उमेश श्रीमंत साळुंखे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top