इचलकरंजी – शहराजवळ असलेल्या कबनूरमधील धुळेश्वरनगरमध्ये शंभुराज भिसे हा चिमुकला घराच्या दरवाजाजवळ खेळत असताना अचानक कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याचा आरडाओरडा ऐकून घरातल्या आई-वडिलांनी धाव घेत त्याची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.


