स्वतःच्याच घरी चोरी करणाऱ्याला एलसीबीने केलं जेरबंद…

कोल्हापूर – करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगणापूरमधील शाकंभरी कॉलनीत राहणाऱ्या सुनील बंडगर यांच्या घरातून सोमवारी अज्ञाताने दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी करवीर पोलीसांत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या चोवीस तासांमध्ये या गुन्ह्याचा छडा लावत स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या यश बंडगर याला लक्षतीर्थ वसाहतीमधून अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रक्कम आणि दागिने असा दहा लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Scroll to Top