ए.एस.ट्रेडर्सचा संचालक बाबुराव किसन हजारेचा जामीन अर्ज फेटाळला…

कोल्हापूर – ए.एस. ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला ए. एस.ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांचा संचालक बाबुराव किसन हजारे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र,जिल्हा सत्र न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गुंतवणुकीवर चांगला आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिसात ए.एस.ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार आणि त्याच्या साथीदारां विरोधात गुन्हा दाखल झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी लोहितसिंग सुभेदार याच्यासह त्याच्या काही साथीदारांना बेड्या ठोकल्यात. मात्र संचालक बाबुराव किसन हजारे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला आहे.

दरम्यान हजारे याने जिल्हा सत्र न्यायालयात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र,जिल्हा सत्र न्यायाधीश आर.व्ही. अदोने यांनी हजारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळला

Scroll to Top