कबनूर गोळीबार प्रकरणी पिस्तूल पुरवणारा अभिषेक हाबळे अटकेत

इचलकरंजी – कबनूरमध्ये चारचाकी वाहनात पिस्तुल हाताळताना गोळी लागुन निलेश कांबळे हा जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना शिवाजीनगर पोलिस पिस्तुल बनवण्याच्या कारखान्यापर्यंत पोहचले. या गोळीबाराच्या गुन्ह्यातील संशयीत जॉकी माळगे याच्याकडे असलेले पिस्तूल अभिषेक हाबळे याच्याकडून मिळाल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलीस हाबळे याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी हाबळे याला अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Scroll to Top