कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात एक संतापजनक घटना घडली आहे. सकाळच्या दरम्यान पुजाऱ्याच्या पत्नीने भाविकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुजाऱ्याची पत्नी प्रिया योगेश जोशी यांनी सायली यांच्यासह त्यांची सासू, मुलगा, वहिनी आणि इतर दोन मैत्रिणींना मारहाण केली आहे.
याबाबत सायली रोहन भोसले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पुजाऱ्याच्या पत्नीविरोधात जुना राजवाडा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.




