क्राईम

खळबळजनक : पुण्याच्या न्यायालयाबाहेर गोळीबार…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

पुणे – आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोर्टाच्या परिसरात गर्दी झाली असून खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
न्यायालयाबाहेर बंदूका आणि गोळ्या पडल्याचे दिसून येत आहे. फायर झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा जण होते. कोयते आणि बंदूका घेऊन आरोपी आले होते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते, अशा गर्दीच्या वेळी ही घटना घडली आहे. यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत जखमी झालेला व्यक्ती कोर्टात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top