क्राईम

सावर्डे दुमालात घरफोडी करणाऱ्या महिलेला अटक…चोरी केलेला ऐवज जप्त

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे गणपती कोंडी निकम हे त्यांच्या कुटुंबीया समवेत राहतात. २० नोव्हेंबरला निकम हे कुटुंबीय समवेत कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. यावेळी भर दुपारी निकम यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली सोन्याची बोरमाळ, लहान मुलांच्या अंगठ्या आणि रोकड घेवून एक अनोळखी महिला पळून जात असल्याचे शेतात काम करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी त्या महिलेला पकडून करवीर पोलिसांच्या स्वाधीन केले. सीमा ऋषिकेश ठाकूर असे त्या महिलेचे नाव असून ती राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरात राहते. पोलिसांनी तिच्याकडून निकम यांच्या घरात चोरी केलेले ६५ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहे. सीमा ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय

Scroll to Top