इचलकरंजी – शहरात गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरट्यास अटक करून १६ मोपेड जप्त केल्या आहेत. या कारवाईत शिवाजीनगर, गावभाग, शहापूर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने प्रदीप बाळू मस्के या २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील रहिवासी असलेल्या प्रदीपची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या १६ मोपेड जप्त केल्या आहेत.




