कोल्हापूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाच्यावतीने १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण अवैद्य मद्य वाहतूकीचे २ हजार १२४ गुन्हे दाखल करत दोन हजार १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये एकूण १५८ वाहने जप्त करत सुमारे ५ कोटी ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला करण्यात आला होता. १ जानेवारी २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या
कालावधीत २ हजार ३८३ गुन्हे दाखल करत दोन हजार ९६ संशयिताना अटक करुन १७९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. वर्षभरात एकूण ११ कोटी २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या वर्षभरात एकूण २०९ सराईतांकडून चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे मागवण्यात आली होती. त्यापैकी ४६ जणाची बंधपत्रे प्राप्त झाली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे.
या पत्रकार बैठकीत उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी या पुढच्या काळात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध मद्य तस्करी, वाहतुकी विरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.



