क्राईम

राजारामपुरीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जागांना २ दिवसांची पोलीस कोठडी…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाजूला पोलीस मंगळवारी रात्री गस्त घालत असताना पहाटेच्या सुमाराला आयसोलेशन हॉस्पिटल जवळच्या ग्राउंडवर सहा जण दोन दुचाकीसह संशयास्पदरित्या फिरताना आढळले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हॉकी स्टिक, कोयता, स्क्रू ड्रायव्हर, चटणी पूड, दोरी, कटावणी असे साहित्य मिळून आले होते. पोलिसांनी विजय पुजारी, प्रमोद कसबेकर, संतोष मोटे, पृथ्वी वावरे, चेतन लोंढे, साद मुजावर या सहा जणांना मंगळवारी अटक केली होती. आज न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top