ब्रेकिंग न्यूज
क्राईम

इचलकरंजीत पत्नीकडून पतीची हत्या…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी – शहरात पत्नीने पतीच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घुण हत्या केली आहे. त्रिशूल चौक, गावभाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

सागर दीपक बुरसे हे ४० वर्षांचे असून, त्यांची पत्नी वैशाली सागर बुरसे या नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सेवेत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैशाली बुरसे हिनं पती सागर यांच्या डोक्यात वरवंटा घालून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर ती स्वतःहून गावभाग पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. हत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही.

संबंधित विषय

Scroll to Top