ब्रेकिंग न्यूज
क्राईम

अल्पवयीन मुलीची छेडछाड… साठ वर्षाच्या संशयिताला अटक

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी –  रविवारी सायंकाळी यड्राव येथील मिलींद पाटील या साठ वर्षाच्या संशयिताने अल्पवयीन मुलीशी छेडछाड केली होती. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या काहींनी बुधवारी त्याला घरात जावून जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला मारहाण करून त्याच्या घराची मोडतोड केली होती.

 जसिंगपूर पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून त्यांनी पाटील याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीची जबाब नोंदवून पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आज त्याला जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top