ब्रेकिंग न्यूज
क्राईम

तारण असलेल्या फ्लॅटचं संचकारपत्र… दोघांची १ कोटी १९ लाखांची फसवणूक कंत्राटदाराला अटक

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहरातील रुईकर कॉलनीत राहणाऱ्या रेशम स्वप्निल बंब यांची शनिवार पेठ परिसरात राहणारे कॉन्ट्रॅक्टर निलेश शंकर निकम याच्याशी ओळख आहे. याच ओळखीतून निकम यांचे बांधकाम सुरू असलेल्या जयश्री रेसिडेन्सी इमारतीत रेशम बंब आणि त्यांच्या भाऊ निल कर्नावट यांनी दोन फ्लॅट खरेदी करण्यासाठी दोघांनी मिळून कॉन्ट्रॅक्टर निलेश निकम याला एक कोटी एकोणीस लाख रुपये देऊन संचकार पत्र केले. मात्र प्रत्यक्षात एका पतसंस्थेकडे तारण असलेला फ्लॅटचे संचकारपत्र करून जयश्री रेसिडेन्सी इमारतीतील कोणताही फ्लॅट रेशम बंब आणि नील कर्नावट यांना न देता निकम याने फसवणूक केल्याची फिर्याद बंब यांनी राजारामपुरी पोलिसांत दाखल केली. त्यावरून निलेश निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी एक कोटी एकोणीस लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी निलेश निकम याला आज अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

संबंधित विषय

Scroll to Top