ब्रेकिंग न्यूज
क्राईम

बसंत बहार रोडवरील सीडीएम फोडण्याऱ्या एका तरुणाला अटक

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गुरुवारी पहाटेच्या सुमाराला कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके हे बसंत बहार रोड परिसरात रात्र गस्त घालत होते. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोषागार शाखेजवळ असलेल्या कॅश डिपॉझिट मशीनजवळ एक तरुण संशयास्पद रित्या फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कॅश डिपॉझिट मशीनजवळ जाऊन पाहणी केली असता संबंधित तरुणाने या ठिकाणी मशीन उचकटून मशीनमधील रोकड चोरण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनाला आले. पोलिसांनी तात्काळ संशयित तरुणाला अटक केली. नुमान माणिक नायकवडी असे त्याचे नाव असून तो कागल तालुक्यातील बाचणी गावचा आहे. दरम्यान आज संशयित नुमान नायकवडी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top