नाशिक – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर विजय खैरनार या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी आज मालेगाव न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली होती. डोंगराळे गावातील अवघ्या चार वर्षांच्या मुलीला आरोपी विजय खैरनार याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने मुलीचे अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर स्वतःचा गुन्हा उघड होऊ नये, या उद्देशाने तिच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या केली.




