ब्रेकिंग न्यूज
क्राईम

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार… शिवाजीनगर पोलिसांकडून एकाला अटक

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी –  अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी  स्वप्नील कांबळे या नराधमाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपी स्वप्नील कांबळे याने पिडीत महिलेचे अश्लील फोटो काढले होते. हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी देत कांबळे याने पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. यााबाबत पिडीतेने इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top