ब्रेकिंग न्यूज
ठळक बातमी

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..!

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन द्या : परिवहन मंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला साधारणतः ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळणे आवश्यक आहे. दिवाळीच्या सणासाठी कुटुंबियांसह खरेदी, घरगुती खर्च आणि इतर नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेत पगार पडणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला वेतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top