ब्रेकिंग न्यूज
हवामान

भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोडीवर वन्यजीव विभागाने केला ‘हा’ दावा

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – भीमाशंकर अभयारण्यात टॉरेंट पॉवर’च्या पंप स्टोरेज या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. या वृक्ष तोडीला सर्व स्तरातून जोरदार विरोध होत आहे. यावर महाराष्ट्र वन्यजीव विभागाने स्पष्टीकरण देत ते पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र वन्यजीव विभागाने म्हटले आहे कि, भीमाशंकर अभयारण्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही. या परिसरात टोरंट कंपनीकडून ६० हजार, तर वन विभागाकडून ३० हजार अशी एकूण ९० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. प्रकल्पाचे ठिकाण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून १६ किलोमीटर आणि ज्योतिर्लिंग मंदिरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी ४.६ दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळता येईल. १९.७ अब्ज लिटर शीतकरणासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत होईल, असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top