कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यासह घाट माथ्याला आजपासून पुढील तीन दिवस मुंबईच्या हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्या अनुषंगाने घाटमाथ्यावर सुरु असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन उघडला आहे. जिल्ह्यात सप्टेंबरचा बहुतांशी दिवस कोरडा गेला आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची आस लावून बसला आहे. मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी सुखावणार आहेत. हा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी लाभदायी ठरणार असून, सध्या सिंचनासाठी धरणातील विसर्ग सुरू आहे. घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास धरणातून विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो.
जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस यलो अलर्ट ; राधानगरीचा तिसरा दरवाजा उघडला…



