ब्रेकिंग न्यूज
इतर

सॅटर्डे क्लबच्या ‘पन्हाळा चॅप्टर’चा शुभारंभ…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

अनिल पोवार यांची चेअरमनपदी, तर प्रवीण बजागे यांची सेक्रेटरीपदी निवड

कोल्हापूर – उद्योजकांना एकत्र आणून व्यावसायिक सहकार्य, उद्योग वाढ आणि परस्पर व्यावसायिक संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लबच्या पन्हाळा चॅप्टरचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
पन्हाळा चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चेअरमनपदी अनिल पोवार (वक्रतुंड स्टील), सेक्रेटरीपदी प्रवीण बजागे (आनंद रिसॉर्ट, पन्हाळा) आणि ट्रेझररपदी मनोज पोवार (Omson Software) यांची निवड करण्यात आली.

यावेळी सॅटर्डे क्लबचे ट्रस्टी आणि पितांबरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र प्रभू देसाई, क्लबचे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, रिजन हेड कुलदीप कोरगावकर, डेप्युटी रिजन हेड शैलेश देशपांडे आणि सुषमा धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित विषय

Scroll to Top