कोल्हापूर – बॉम्बे आयआयटीमधील साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाची एसआयटीच्यावतीने सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा करा, अशी मागणी कोल्हापूर स्टूडेंट युनियनने केली आहे. यासाठी आज कोल्हापूर स्टूडेंट युनियनच्या वतीने करवीर नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.




