ब्रेकिंग न्यूज
इतर

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – राज्यात दुष्काळाची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. याचा विचार करून राज्य सरकारने २६५ तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश केला आहे. परंतु राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती याचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश केल्याचे घोषित केले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यांचा समावेश केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यामध्ये राज्यातील १९ जिल्ह्यांचा समावेश झाल्याने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी ३०५ पर्यंत गेली आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी पुढीलप्रमाणे –

  1. भंडारा – मोहाडी, तुमसर
  2. गोंदिया – अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव
  3. चंद्रपूर – बल्लारपूर
  4. नांदेड – मुदखेड
  5. नाशिक – चांदवड, त्र्यंबकेश्वर
  6. पुणे – आंबेगाव, जुन्नर
  7. सातारा – पाटण, जावळी
  8. कोल्हापूर – शाहूवाडी, शिरोळ
  9. सांगली – खानापूर, पलूस, शिराळा, वाळवा, कडेगाव
  10. गोंदिया – सालेकसा, गोंदिया
  11. सांगली – विटा
  12. नांदेड – मुखेड
  13. चंद्रपूर – जिवती, ब्रह्मपुरी
  14. वर्धा – कारंजा
  15. नाशिक – निफाड
  16. सांगली – तासगाव
  17. सातारा – कराड, कोरेगाव, वाई
  18. पालघर – जव्हार, मोखाडा, तलासरी
  19. रत्नागिरी – लांजा, मंडणगड, खेड

संबंधित विषय

Scroll to Top