ब्रेकिंग न्यूज
इतर

पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. हर्षदा देशमुख जाधव यांना शिक्षक संघटनांचा पाठिंबा…

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरात नुकतीच विविध शिक्षक संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीला उमेदवार डॉ. हर्षदा देशमुख जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे आणि शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. श्वेता परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत शिक्षक संघटनांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. हर्षदा देशमुख जाधव यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केला. त्यांनी शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी आणि कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बोलताना डॉ. हर्षदा देशमुख जाधव यांनी, ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना बळ देण्याची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे असून ते अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी मराठी शाळा बंद पडत असताना बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी प्राथमिक शाळांच्या स्तरावर विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे, सी. एम. गायकवाड, विलास पिंगळे, दिलीप माने, राजेश वरक, प्रा. राजेंद्र मोरे आणि शिवाजी कोरवी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.

या बैठकीला प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, शिक्षक सेवक पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी सोनाळकर, शिक्षक समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा सविता गिरी, ऑल इंडिया एलिमेंटरी टीचर फेडरेशनचे महासचिव सुधाकर सावंत, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे जनरल सेक्रेटरी सी. एम. गायकवाड, आश्रमशाळा संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजी कोरवी, उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष इरफान अन्सारी, खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर महासंघाचे सचिव राजेंद्र कोरे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास पिंगळे, काँग्रेस शिक्षक सेलचे कार्यवाह सुहास पाटील आणि शिक्षक सेनेचे समन्वयक संतोष आयरे माध्यमिक कर्मचारी शिक्षक संघाच्या विश्वस्त प्रिया गळतगे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मोरे, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा सविता गिरी, शहराध्यक्षा चारुलता पाटील, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top