शिक्षक – पदवीधर निवडणूक ; भाजपने ‘या’ उमेदवारांना दिली संधी

मुंबई – भाजपने विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना, नागपूर पदवीधरमधून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना संधी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रिंगणात हे सर्व उमेदवार प्रचार करताना दिसणार आहेत.
भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांवर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Scroll to Top