त्यांची भाषा २५-० करण्याची, आम्ही दूध उत्पादकांना २५ रुपये दर वाढवून देणार : आ सतेज पाटील

कोल्हापूर – जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्यावतीने राधानगरी तालुक्यातील दूध संस्था ठरावधारकांच्या आमदार सतेज पाटील यांनी भेटी घेतल्या.

यावेळी  म्हासुर्ली, केळोशी बुद्रुक, धामोड, कोते, चादे, राशिवडे, येळवडे, पुगाव, शिरगांव, कांबळवाडी, घुडेवाडी, कंथेवाडी, कसबा तारळे, गुडाळ, कुडुत्री, सोन्याची शिरोली, राधानगरी या गावांमध्ये ठरावधारकांच्याबरोबर बैठका पार पडल्या. यावेळी माजी सरपंच बापू भिसे, अशोक साळुंखे, विलास पाटील, अशोक पाटील, नामदेवराव जाधव, सरपंच रोगे, नामदेव पाटील, मच्छिंद्र कांबळे, नितीन सोनवणे, मारुती तामकर, सिताराम फडके, एल. एस. पाटील, तुषार बोडवे, विनायक कोरे, संदीप नलवडे, उपसरपंच सागर कांबळे, आनंदा धनवडे, विलास पाटील, लहू बिडकर, केरबा टिपकुर्ले, दगडू चौगुले, सुदर्शन कुरणे, बापू चौगुले, सरपंच रंगराव गुरव, धनाजी गुरव, बंडा कोतेकर, गोते गुरुजी, राजू कोतेकर, नारायण बाणे, शामराव जाधव, विलास माने, ए. डी. पाटील, विश्वनाथ पाटील, रवींद्र पाटील, अशोक पाटील, पांडुरंग भांदिगरे, अशोकराव भांदिगरे, उमेश पवार, दिपक पाटील, सरपंच जयदीप पाटील, शहाजी रेडेकर, जयदीप मधुकर पाटील, निवास पाटील, संदीप बळप, सर्जेराव पाटील, गवशीक, पांडुरंग भांदिगरे, एकनाथ पाटील, मधुकर रामाणे, राजू साबळे, अशोकराव साळोखे, चंद्रकांत चौगुले, साहील पाटील कौलवकर, एम. जी. पाटील, सहदेव कांबळे दगडू चौगले, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, रघुनाथ पाटील, दगडू फाले, डॉ. केरबा जोगम, सदाशिव पाटील, संजय कांबळे, सर्जेराव चौगुले, शहाजी पाटील, दादू पाटील, धर्मा कांबळे, संजय सुतार, रवींद्र पाटील, रंगराव अस्वले, मारुती अस्वले यांच्या भेटी घेतल्या.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि ग्रामीण जनतेला दर दहा दिवसांनी थेट पैसे देणारी एकमेव भक्कम आर्थिक व्यवस्था आपल्याकडे असल्याचे सांगितले. अशी व्यवस्था इतर कोणत्याही जिल्ह्यात पाहायला मिळत नाही. ‘गोकुळ’ दूध संघाचा मल्टीस्टेट प्रस्ताव उधळून लावण्यापासून ते शेतकऱ्यांना खरा न्याय देण्यापर्यंत आम्ही सातत्याने प्रयत्न केलेत. त्यामुळे आगामी काळात गोकुळमध्ये एकमुखी नेतृत्वाला सत्ता द्या, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

विरोधी पॅनेल प्रमुख २५-० असा निकाल लावून उमेदवार निवडून आणण्याची भाषा करत आहे. मात्र, आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आमच्या आघाडीचा मुख्य उद्देश उमेदवारांपेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला २५ रुपये दर वाढवून देणार आहोत, तसेच पशुखाद्याचे दरही कमी करून देणार आहोत. ही सत्ता मला वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर केवळ साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.

स्मार्ट मीटर योजना, दुष्काळग्रस्तांना मदत, शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि शेतीपंपांच्या पाणीपुरवठ्याबाबत फेडरेशनच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनांचा उल्लेख करत, सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरून लढलो असल्याचे त्यांनी सांगितलर. याच भूमिकेतून गोकुळ दूध संघातही एकमुखी सत्ता आणण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

कांबळवाडीचे शहाजी रेडेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले, गोकुळ दूध संघ टिकवण्यासाठी आणि आमच्यासारख्या दूध उत्पादकांच्या भविष्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. सध्या सुरू असलेल्या महायुद्धासारख्या राजकीय भांडणांमुळे भविष्यात गोकुळच्या माध्यमातून न्याय मिळेल, अशी शक्यता वाटत नाही, म्हणूनच आम्ही सतेज पाटील यांना पाठिंबा देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

 तारळे गावचे सरपंच रवी पाटील आणि कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटीचे सदस्य शिवाजी पाटील यांनीही आपले विचार मांडले. गेल्या पाच वर्षांत गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. हे काम पाहूनच आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत त्यांनी पाटील यांच्या पॅनेलला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

 गुडाळ गावातले महादेव कोथळकर यांनी यावेळी बोलताना, आम्ही ए वाय पाटील ग्रुपचे असलो तरी सध्याची परिस्थिती पाहता, गोकुळ टिकावा. यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी आमदार राजू बाबा आवळे, तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, अभिजीत तायशेटे, सदाशिव चरापले, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे, ए.डी पाटील, पंचायत समिती सदस्या अमृता पाटील, रवींद्र पाटील, विश्वनाथ पाटील, ए, डी चौगुले, सुशील पाटील कौलवकर, रमेश बचाटे, चंद्रकांत चौगुले, सरपंच संदीप ढवर यांच्यासह ठरावधारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top