ब्रेकिंग न्यूज
राजकीय

दिल्लीतल्या आंदोलनात कोल्हापूरवासियांनी सहभागी व्हावं : दिनेश खोडानिया याचं आवाहन

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य राजस्थानचे माजी मंत्री, आणि पक्ष निरीक्षक दिनेश खोडानिया हे ‘व्होट बचाव, देश बचाव’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.  कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दिनेश खोडानिया यांनी भाजपवर निशाणा साधला. एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली सत्ताधारी भाजप सरकार देशातील नागरिकांची नावं मतदार यादीतून वगळत आहेत. ही लोकशाहीच्या दृष्टीनं धोक्याची घंटा आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण देशभरात व्होट बचाव, देश बचाव हे अभियान हाती घेण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण देशभरात घरोघरी जाऊन मतदार यादीतून नावं कमी झालेल्या मतदारांची नावं पुन्हा मतदार यादीत कशी बसवता येतील यासाठी जनजागृती करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा लढा सुरू राहणार आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा,  ईव्हीएम मशीनवरील मतदान प्रक्रिया बंद करण्यात यावी, सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, चुकीच्या पद्धतीची एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यात यावी, या मागण्यांसाठी काँग्रेसचा हा लढा सुरूच राहणार आहे. असे खोडानिया यांनी सांगितले.

भाजप सरकार विरोधात इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एक नोव्हेंबरला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत. कोल्हापुरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खोडानिया यांनी केले आहे. या पत्रकार बैठकीला माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, भारती पोवार, भैय्या शेटके संजय पटकारे, उदय पोवार, संपतराव पाटील, नंदू पिसे, संजय पोवार वाईकर, अक्षय शेळके आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top