ब्रेकिंग न्यूज
राजकीय

राज ठाकरेंनी डॉक्युमेंट्रीची पोस्ट केली डिलीट…

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

पोस्टला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न झाला : राज ठाकरे

मुंबई – काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, आपल्या सोशल मीडियावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा चेहरा मोहरा दाखवणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री पोस्ट केली होती. त्या डॉक्युमेंट्रीची पोस्ट राज ठाकरेंनी डिलीट केली आहे याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी, मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं. यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच, म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय.

जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी 2026 ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी 2026 ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील. आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी 2026 च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा, असे आवाहन केलं आहे.

संबंधित विषय

Scroll to Top