क्राईम

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या पतीला कर्नाटकातून अटक… हुपरी पोलिसांची कारवाई

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – हुपरी शहरातील श्रीशैल्य पुजारी याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यापासून पसार झाला होता. हुपरी पोलिसांची कारवाई करत पतीला कर्नाटकातून अटक केली आहे.

हुपरीतील गणेश माळ परिसरात राहणारा श्रीशैल्य पुजारी हा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जात होता तर त्याची पत्नी सुजाता या पट्टण कोडोलीतील एका दुकानात कामाला जात होत्या. या पती-पत्नींमध्ये वारंवार वाद होत होते. १२ ऑगस्टला सुजाता या पट्टणकोडोली येथे कामावर जात असताना तळंदगे फाटा येथील  ओढ्याजवळ पती श्रीशैल्य याने त्यांना थांबवून धारदार कटरने त्यांचा गळा चिरत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात सुजाता या गंभीर जखमी झाल्या तर श्रीशैल्य पसार झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून पसार असणारा संशयित श्रीशैल्य पुजारी याला हुपरी पोलिसांनी कर्नाटकातील विजापूरमधून अटक केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top