क्राईम

चांदेकरवाडीत शेत जमिनीच्या वादातून मारहाण ; जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू… तिघांना अटक

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडीतील सचिन यशवंत खोत आणि त्यांच्या कुटुंबियांचा भाऊबंदकीतील खोत कुटुंबाशी शेत जमिनीवरुन वाद सुरु होता. ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमाराला आणि ५ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमाराला शेतजमिनीच्या वादातून खोत कुटुंबियांनी सचिन यशवंत खोत यांच्या वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेले सचिन खोत यांनाही हातावर, डोक्यावर आणि पाठीवर काठ्यांनी मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या यशवंत खोत यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी रात्री उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शेत जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीतून वडिलांचा मृत्यू झाल्या प्रकरणी सचिन यशवंत खोत यांनी संशयित शिवाजी महादेव खोत, रितेश शिवाजी खोत आणि वैशाली शिवाजी खोत यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राधानगरी पोलिसांनी या गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक अजित सिद, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती खोत पुढील तपास करत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top