क्राईम

आठवडा बाजारात वृध्द महिलांचे दागिने चोरणाऱ्या सख्ख्या भावांना अटक…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई गणपती निऊंगरे या १७ ऑक्टोबर रोजी उत्तुर येथील  आठवडी बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी अज्ञातांनी हातचलाखी करून त्यांच्या दागिन्यांची चोरी केली होती. या प्रकरणी लक्ष्मीबाई निऊंगरे यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निपाणीत विजय व्यंकप्पा गोंधळी, राकेश व्यंकाप्पा गोंधळी या दोघा सख्ख्या भावांना कागल मुरगूड रोडवर सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि चोरीचे सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार संदीप गायकवाड, योगेश गोसावी, युवराज पाटील, शुभम संकपाळ, सतीश जंगम, समीर कांबळे, राजू कोरे, रोहित मर्दाने, अमित सर्जे, संजय हुंबे, सतीश सूर्यवंशी, अमित मर्दाने, सुदर्शन कांबळे यांनी कारवाई सहभाग घेतला होता.

संबंधित विषय

Scroll to Top