क्राईम

इचलकरंजीतील साईट नंबर १०२ मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी…चौघे गंभीर जखमी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी – शहरातील साईट नंबर १०२ परिसर आज सकाळी रक्तरंजित हाणामारीने हादरला. सकाळी अकराच्या सुमाराला साईट नंबर १०२ मधील चौकात चौघांना बोलावून घेत २० ते २५ जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

या हल्ल्यात तलवार, फायटर आणि काठ्यांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये गौरव बागडे, कुणाल गणेश बागडे, गणेश अनिल बागडे आणि यश गणेश बागडे हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, गौरव बागडे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे तर उर्वरित तिघांवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दिवाळीचा सण  सुरू असताना भरदिवसा तलवारी आणि काठ्यांनी झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण  झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकरणी गावभाग पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top