क्राईम

अहिल्यानगरात गोळीबार करून पसार झालेल्या दोघांना कणेरीतून अटक

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  अहिल्यानगर जिल्हयातील साईनाथनगरात १० ऑक्टोबर रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक उर्फ कल्याण चव्हाण आणि हरण चव्हाण या दोघांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून रमेश छगन भोसले याच्यावर गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर अभिषेक आणि हरण दोघे पसार झाले होते. दरम्यान हे दोघे कणेरी येथे वास्तव्यास असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अभिषेक आणि हरण या दोघांना जेरबंद केले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील,  गजानन गुरव,  सत्यजित तानुगडे,  विशाल खराडे, महिंद्र कोरवी, शिवानंद मठपती, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, सागर चौगुले, राजू येडगे, अरुण धनगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

संबंधित विषय

Scroll to Top