क्राईम

इचलकरंजी एसटी बसस्थानकावर गंठण चोरणाऱ्या महिलेला अटक

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी इचलकरंजी बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने एका महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण लंपास केले होते. या प्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास करताना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातकणंगलेमध्ये राहणाऱ्या सपना वैभव कदम हिला अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून सुमारे पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण जप्त केले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top