क्राईम

कागल लक्ष्मी टेकडी परिसरात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कागल लक्ष्मी टेकडी परिसरात कारवाई करत बेकायदा गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे. राहुल ज्योतीराम पाटील असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गोवा बनावटीचा मद्यसाठा ,रोकड,मोबाईल संच आणि चार चाकी वाहन असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे – बेंगलोर महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी कागलमधील लक्ष्मी टेकडी येथे    सापळा रचून गोवा बनावटीच्या मद्याची  बेकायदा वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top