कोल्हापूर – संशयित आरोपी श्रीकांत फडतारे आणि आकाश फडतारे यांनी ओंकार पाटील याला यापूर्वी मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी कोल्हापूरातील कपिल दबडे, भाऊ सनी दबडे, ओंकार पाटील, विकास हेगडे आणि आदित्य पाटील हे बुधवारी हसूर दुमालामध्ये गेले होते. यावेळी श्रीकांत फडतारे याने वस्ताऱ्याने ओंकार पाटील, सनी दबडे आणि कपिल दबडे यांच्यावर वार केला. तसेच फडतारे आणि त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी तिघांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत कपिल दबडे, सनी दबडे आणि ओंकार पाटील हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत आणि आकाश फडतारे या संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम मगदूम याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



