समाजातील प्रश्नांचे बारकावे शोधून पत्रकारिता करा : ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ

<p>समाजातील प्रश्नांचे बारकावे शोधून पत्रकारिता करा : ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ</p>

कोल्हापूर – समाजाच्या तळागाळातील प्रश्न समजावून घेऊन, त्यांचे बारकावे शोधून पत्रकारिता करा, असे प्रतिपादन पी साईनाथ यांनी केले. अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांना अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार देण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, शाल, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तर पत्रकार अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना पी साईनाथ यांनी, कुठल्याच पिकासाठी शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे म्हटले आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी, अनंत दीक्षित यांनी कोल्हापुरात पत्रकरिता करताना सर्व स्तरातील संवाद साधला असे सांगितले  तर सध्याची लोकशाही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे की केवळ काहींनाच सोबत घेऊन जाणारी आहे, यावर अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अभिजीत करंडे यांनी, पत्रकारितेतील तिसरा डोळा सतत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे सांगत हा पुरस्कार मला नेहमी जबाबदारीची जाणीव करून देईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.