ब्रेकिंग न्यूज
क्राईम

इचलकरंजीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी – शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेताळ पेठेत केलेल्या  कारवाईत  एक लाख ४० हजार रुपये किंमतीची गोवा बनावटी दारू आणि एक वाहन असा सुमारे पाच लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मल्लिकार्जुन शंकर पनोरी याला ताब्यात घेतले आहे. 

यावेळी फोर्ड कंपनीच्या प्रेस्टा गाडीत विविध देशी-विदेशी ब्रँडची दारू आढळून आली. या कारवाईनंतर गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करताना सीमावर्ती तपासणी, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मार्ग आणि अखेरीस इचलकरंजी शहरापर्यंत हा साठा पोहोचतो कसा? एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असताना तस्करी रोखण्यात यंत्रणांना आणखी प्रभावी कारवाई करता येणार नाही का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top