कोल्हापूर – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने आज हातकणंगले वडगाव – रोडवरील ड्रीम्स लॉजवर छापा टाकला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय चालवणारा लॉज मालक संताजी धनगर याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगली येथील 2 पीडित महिलांची सुटका करत रोकड आणि मोबाईल संच जप्त केला आहे.
हातकणंगले – वडगाव रोडवरील ड्रीम्स लॉजवर महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेला मिळाली होती. पोलिसांनी आज या लॉजवर छापा कारवाई करत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या सांगलीतील दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. यावेळी पोलिसांनी लॉजवरून एक रजिस्टर, रोकड, मोबाईल संच असा सुमारे 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.




