ब्रेकिंग न्यूज
क्राईम

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा सराईत गुन्हेगारांना अटक… २ लाखांचा मुद्देमाल जप्त

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील पोलीस गस्त घालत असताना आज पहाटेच्या सुमारास आयसोलेशन हॉस्पिटल जवळच्या ग्राउंडवर सहा जण दोन दुचाकीसह संशयास्पदरित्या फिरताना मिळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हॉकी स्टिक, कोयता, स्क्रू ड्रायव्हर, चटणी पूड, दोरी, कटावनी असे साहित्य मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

विजय पुजारी, प्रमोद कसबेकर, संतोष मोटे, पृथ्वी वावरे, चेतन लोंढे, साद मुजावर अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी दरोडा, बलात्कार असे २५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकी, सात मोबाईल संच आणि इतर साहित्य असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top