फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक…धागेदोरे पोहचले दुबईपर्यंत

कोल्हापूर –  शेअर बाजारात गुंतवणूक करायला लावून कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या मोहसिन कादर मणेर याच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्यात आला आहे. मणेर याने जॉनमहेश पेरियामनीच्या मध्यस्थीने फसवणुकीची रक्कम रोख घेवून त्याचे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर केले आणि ट्रस्ट वॉलेटच्या माध्यमांतून दुबईतील हँटेक मार्केट कंपनीत ट्रेडिंगसाठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पेरियामनी याला पाच सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मणेर यानेचं न्यायालयासमोर पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. दुबईतील एका व्यक्तीकडे गुंतवणूक केल्याचे सांगत त्याचा शोध घेण्यासाठी तपासात सहकार्य करण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. न्यायालयाने मणेर आणि पेरियामनी यांना नऊ सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Scroll to Top