महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने पत्रकारांचा विशेष सन्मान...

<p>महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने पत्रकारांचा विशेष सन्मान...</p>

कोल्हापूर - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस बांधवांच्या प्रश्नासाठी प्रयत्न करतीय. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूरात संघटनेच्या कार्याला पाठबळ देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा  विशेष गौरव करण्यात आला आहे.

 यावेळी एस न्यूजचे पत्रकार विश्वास पानारी, बाळासाहेब पाटोळे, प्रमोद व्हनगुत्ते, प्रथमेश कात्रट, संपत नरके, सद्दाम शेख, निवेदिका प्रतिक्षा पाटील, मुरलिधर कांबळे,  विजय यशपुत्त,  तुषार पाटील, रितेश सावंत, ऋतिक भाटे आदींचा राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ. विकास बिसुरे, पोलीस बाॅईज संघटनेचे अध्यक्ष संजय माने, योगेश पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे. 

यावेळी राज्य पोलीस सफाई कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजय माने, अजित लोहार, समाधान पाटील, सुरेश लोहार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि पोलीस विभागात काम करणारे अंशकालीन सफाई कामगार उपस्थित होते.