जुना बुधवार पेठेत शिवजयंती उत्सवाला आजपासून सुरवात... 

<p>जुना बुधवार पेठेत शिवजयंती उत्सवाला आजपासून सुरवात... </p>

कोल्हापूर – शहरातील जुना बुधवार पेठ येथील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या शिवसप्ताहाला आजपासून सुरवात झाली आहे. आज  गुरुवार १६ एप्रिल ते मंगळवारी २१ एप्रिल पर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शिवजन्मकाळ सोहळ्यासह विविध  प्रबोधनात्मक  कार्यक्रम, शिबीर, सलाम महाराष्ट्र लोककला संगीताचा कार्यक्रम, शिवमय मोटार सायकल रॅली, कराओके कार्यक्रम, संगीत सोंगी भजन मंडळाचा कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवसप्ताहाची सांगता २१ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढून करण्यात येणार असल्याची माहिती  संस्थेचे सेक्रेटरी सुशील भांदिगरे यांनी दिली आहे.

यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे  यांच्यासह संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.