‘या’ दिग्गज आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपणार... 

<p>‘या’ दिग्गज आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपणार... </p>

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, भाजपचे गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके,रमेश कराड आणि काँग्रेसचे राजेश राठोड आदींचा विधान परिषदेच्या सदस्य पदाचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. 
पुढील आठवड्यात विधान परिषदेच्या या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच आहे.