देशाच्या इतिहासातील पहिली घटना ; निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएमची होतीय तपासणी 

<p>देशाच्या इतिहासातील पहिली घटना ; निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएमची होतीय तपासणी </p>

मुंबई – देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनची तपासणी होत आहे आणि या तपासणीला आजपासून  सुरुवात झाली आहे.  मुंबई उपनगरमधील चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम तपासण्याचा  आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सहा दिवसां पूर्वी दिला होता. त्यानुसार आज आणि उद्या ईव्हीएम उत्पादक बंगळुरू येथील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून ही तपासणी होत आहे. पहिल्यांदा अशा प्रकारे ईव्हीएमची तपासणी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चांदिवली मतदार संघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2024 मध्ये शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे विरुद्ध नसीम खान यांच्या लढत होती. या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला. या निकालाविरोधात खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी गडबड झाल्याची बाजू न्यायालयात मांडली. यावर न्यायालयाने त्यांचे मुद्दे लक्षात घेत, ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या तपासणीतून किती आकडे बाहेर येतात  हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.