‘या’ दिवसापासुन अमरनाथ यात्रा होणार सुरु 

<p>‘या’ दिवसापासुन अमरनाथ यात्रा होणार सुरु </p>

श्रीनगर -  दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध असणारी अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होत आहे. ही यात्रा ५७ दिवस चालणार आहे. या यात्रेसाठी पहिली तुकडी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून प्रस्थान करणार आहे. अनंतनागपासूनचा 48 किमी लांबीचा पारंपरिक नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबलपासूनचा 14 किमी लांबीचा बाल्टाल मार्ग यात्रेसाठी खुला राहणार आहे.
  या यात्रेसाठी भाविकांची नोंदणी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. देशभरातील ५५६ बँक शाखांमध्ये तसेच श्री अमरनाथच्या  अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.