बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग...

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रीय

<p>बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग...</p>

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राज्यसभा खासदार होणार आहेत. त्यामुळे बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. नितीशकुमार हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यामुळे बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरु आहे.

बिहारमधील सत्ताधारी जदयू आणि भाजपने आज आमदारांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.  नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदाचा आज राजीनामा देतील अशी शक्यता आहे. यामुळं नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात दिल्लीपासून पाटणा पर्यंत घडामोडी वाढल्या आहेत.